Anand Dighe यांना मोठ्या पदावर बसवलं तर… दिघेंच्या हत्येवरून Sanjay Shirsat यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप

Anand Dighe यांना मोठ्या पदावर बसवलं तर… दिघेंच्या हत्येवरून Sanjay Shirsat यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप

ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर आधारित ‘धर्मवीर २’ चित्रपट (Dharmaveer 2) शुक्रवारी (२७ ऑगस्ट) रिलीज झाला. यावरून आधीच मोठा वाद निर्माण होत असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यात आणखी भर पडली आहे. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून शिवसेना (Shivsena) आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूवर संशय निर्माण करत शिरसाट यांनी आनंद दिघे यांची हत्या झाली असल्याचे वक्तव्य केले. होते. यावरून मोठा वाद झाल्याने संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावरून पुन्हा एकदा मोठे भाष्य करत, “आनंद दिघेंला मोठ्या पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल, त्यांची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खूण केला,” असा आरोप त्यांनी केला आहे.

संजय शिरसाट यावेळी म्हणाले, “काल मी दिघे साहेब यांच्या मृत्यु संदर्भात वक्तव्य केले त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र माझी जी शंका होती त्यावर मी बोललो. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते, दिघे साहेब कधी बाळासाहेबांच्या बाजुला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे हे सर्व झाले. दादर मधे एक मेळावा झाला त्यात गद्दार नेता नव्हता त्यावेळी आनंद दिघे साहेब त्याला शोधत होतो,. राज ठाकरे का गेले कुणामुळे गेले याची कारण काय ? हे सर्व लोक कुणाच्या मुळे गेले हे सामोर आलेले नाही. त्यांची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खूण केला असा माझा आरोप आहे. आनंद दिघेंला मोठ्या पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल त्याचं लोकांनी त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरण नावानिशी उघड करण्याची ताकत ठेवतो,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आज पण हि लोकं त्याचं घडीसारखे राजकारण करत आहेत. इथे मोठं होणारा नको अमच्या सारखं चालणारा हवा अश्या भूमिकेतील ती लोक आहेत. त्या लोकांमुळेच नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरेंनी पक्ष सोडला. ती गेलेली लोक शिवसेना प्रमुख यांच्या विरोधात नव्हती यांच्या मुळे गेली. एकनाथ शिंदेंना नक्षली नावाने धमक्या का येतं होत्या. एवढ्या धमक्या येऊन त्यांना सुरक्षा नव्हती, मात्र शिंदे साहेब खंबीर होते,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version