Sunday, July 7, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray बाळासाहेबांचं नाव छोटं करताहेत; Sanjay Shirsat यांची टीका

शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "काल डोममध्ये खरे शिवसैनिक होते. आमची शिवसेना खरी असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते," असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

शिवसेना वर्धापन दिन (Shivsena Foundation Day) काल (बुधवार,१९ जून) पार पडला. शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena) वरळी डोम येथे तर शिवसेना उबाठा गटाकडून (Shivsena UBT) माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे मोठा कार्यक्रम पार पडला. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह महायुतीवर जोरदार टीका केली. अश्यातच, आता शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “काल डोममध्ये खरे शिवसैनिक होते. आमची शिवसेना खरी असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

यावेळी पत्रकार परिषदेत संजय शिरसाट म्हणाले, “काल शिवसेनेचा ५८ वर्धापन दिन आम्ही साजरा केला, उबाठा गटाच्या लोकांनी सुद्धा साजरा केला. बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली त्यात शिवसैनिकांचा सहभाग होता त्यांचा भाषणात उल्लेख झाला नव्हता. विरोधी पक्षातील लोक देखील बाळासाहेब ठाकरे यांच नाव आदराने घेतात आणि हे त्यांच नाव छोटा करतात. शिवसेनाप्रमुख हे मोठं नेतृत्व आहे त्याला लिमिटेट करु नका. तुम्ही देखील शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा नाव आणि फोटो वापरतात. त्यांना वाटतं शिंदे मिंधे म्हटलं की लोक माझ्या भाषणाला उत्तम प्रतिसाद देतात असं नाही. काल डोममध्ये खरे शिवसैनिक होते. आमची शिवसेना खरी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.”

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करत ते पुढे म्हणाले, “संजय राऊत यांच्या तोंडात निष्ठावंत हा शब्द भयानक आहे. त्यांचा आणि निष्ठेचा काही संबंध नाही. ईव्हीएम कधीहि हॅक होत नसतं, सुजय विखे पडलेले असतील तरी ते त्यानी मान्य केलेले आहे आणि ईव्हीएम (EVM) बद्दलच्या शंका कुशंका दुर होतात. ज्यांना काही शंका असेल त्यांना कार्टा्च्या माध्यमातून सोडवावा. उबाठाचं सरकार येणार आहे का ? सरकार काँग्रेसचं येणार आहे आणि त्यांना नाचायचं आहे त्यांच्यासोबत जल्लोष करायचा आहे. शिवसेना प्रमुखांना काँग्रेस नको आता हे त्याच्यासाठी नाचतायत, बॅण्ड वाल्यासारखं हे नाचणार आणि सत्ता दुसरे जण भोगणार.”

ते पुढे म्हणाले, “आम्हाला कोणत्या झेंड्यावर कोणत चिन्ह टाकायचंय तो आमचा प्रश्न आहे. त्यांचा आवडता रंग हिरवा आहे. हिरव्या रंगावर ते मशालीची चिन्ह छापावं असा संदेश शिवसैनिकांना त्यांनी दिला असावा.”

हे ही वाचा

फडणवीसांच्या Encounter ची ही अयोग्य वेळ, दिल्लीला त्यांच्याकडूनच करून घ्यायचाय सत्तेचा मेळ

Uddhav Thackeray हे Balasaheb Thackeray यांच्या हिंदू मतांनी नाही तर Congress च्या मुस्लिम मतांमुळे विजयी: Nilesh Rane

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss