Uddhav Thackeray यांना त्यांची जागा कळाली आहे: Sanjay Shirsat

Uddhav Thackeray यांना त्यांची जागा कळाली आहे: Sanjay Shirsat

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवण्याचे निश्चित असले तरी अद्याप महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. आज (बुधवार, ४ सप्टेंबर) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केले. ‘मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावर होणार आहे. १९७७ मध्ये सर्वजण एकत्र आले होते त्यानंतर मोरारजी देसाई यांचे नाव समोर आले होते, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आता विचार करण्याचं काहि कारण नाही, असं म्हंटल आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “शरद पवार यांचं स्टेटमेंट हे जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य आहे. उबाठाला कसं संपवायचं, त्याची पद्धतशीर आखणी पवार यांनी केली आहे. अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांना बोलायला लावलं, नंतर पटोले यांना बोलायला लावलं. महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी होणार आहे, त्याची काल सुरुवात पवारांनी केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नाही, हे संकेत काल दिले आहेत,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. शरद पवार कधीही करायचं एक आणि बोलायचं एक ही त्यांची कृती होती. लोकसभेत मुस्लिमांची मते तुम्हांला चालतात, भुलवून मते घेतात. शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री पदामध्येच इंटरेस्ट दाखवला आहे. त्यांना जे करायचे असते, ते कधी बोलत नाही. हा त्यांचा डाव आहे,” असे ते म्हणाले.

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली येथे झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे मुख्य घटक असलेल्या शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. यावरून भाष्य करत संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा कळाली आहे. त्यांना कार्यक्रमात कोपऱ्याची जागा मिळेल, अपमान होईल. तो अपमान टाळण्यासाठी त्या कार्यक्रमात त्यांनी जाणे टाळले. तीन दिवस दिल्लीत बसून देखील काही मिळालं नसल्याने उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

जयदीप आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामिनाची तयारी ८ दिवसापासून सुरू होती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Jaydeep Apate Arrest: असा पकडला जयदीप आपटेला… कल्याणच्या डीसीपी यांनी सांगितला थरार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version