संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ ?

आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण आता राज्याला माहिती झालेलं आहे. त्यांनी आज पुन्हा एक नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मंत्रालयातच त्यांनी हा कुटाणा केल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदेखील केलीय.

संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ ?

आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण आता राज्याला माहिती झालेलं आहे. त्यांनी आज पुन्हा एक नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मंत्रालयातच त्यांनी हा कुटाणा केल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदेखील केलीय. शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारची ही घटना असून पोलिसाने वरिष्ठांकडे याची लेखी तक्रार केली आहे. यावर बांगर यांनी असे काही घडलेच नसल्याचे म्हटले आहे.

संतोष बांगर हे १०-१२ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. यावेळी पोलिसाने त्यांना हटकले आणि नोंद करून जाण्यास सांगितले. यावर बांगर यांनी या पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची तक्रार या पोलीस कर्मचाऱ्याने केली. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आमदार बांगर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २७ ऑक्टोबर रोजी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असतांना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या आमदार बांगर यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. तर अशा पद्धतीने आता तू मला शिकवणार का? असे म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्याने या घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.

तसेच या सर्व प्रकरणी आमदार बांगर म्हणाले की, मी कोणतेही शिवीगाळ केली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नसल्याच आमदार बांगर म्हणाले आहेत. मात्र आपण गार्डन गेटने गेलो होतो हे आमदार बांगर यांनी मान्य केलं आहे.

हे ही वाचा :

ST कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार? शिंदेंनी बोलावली कामगारांची बैठक; ‘हे’ निर्णय होण्याची शक्यता

शिंदे पुत्र Vs ठाकरे पुत्र! आता सामना रंगणार वारसदारांमध्ये; मतदारसंघ एक तर सभा दोन

Kartiki Ekadashi : अमृता फडणवीसांनी घातली फुगडी तर देवेंद्र फडणवीसही टाळाच्या तालावर थिरकले!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version