spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्यजित तांबेनी भाजपात प्रवेश करावा, राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान

सध्या महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. या पदवीधर निवडणुकीमध्ये (Graduate Election) सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक मतदार संघ (Nashik Constituency). अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्यामुळे नाशिकची राज्यभर चर्चा आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गावातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयात पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असून सत्यजित तांबे यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला पाहिजे. यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचे म्हणत सुधीर तांबेंचे काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल अस मिश्कील वक्तव्य सुद्धा विखे पाटलांनी केलं आहे.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

दरम्यान, काल भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांची सत्यजीत तांबे यांनी भेट घेतली. माझ्याशी त्यांनी निवडणुकी संदर्भात चर्चा केली. पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याचे मला आठवत नाही. पण, सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

कालच्या मोर्चावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केल्यानंतर विखे पाटलांनी संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. कालचा मोर्चा सकल हिंदू समाजाचा होता. त्यात सगळ्या पक्षाचे लोक सहभागी झाले होते. हिंदूत्वाशी फारकत घेतलेल्या ठाकरे सेनेला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. मोर्चा कोणत्या सरकार विरोधात नाही तर लव्हजिहाद (Lovejihad) आणि धर्मांतरा विरोधात जागृती करण्यासाठी होता. शिवसेनेचा लव्ह जिहादला आणि धर्मांतराला पाठींबा आहे का..? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सेनेला केलाय. तर आमच्यावर टिका करण्यापेक्षा तुमची भुमिका स्पष्ट करा. या राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही विखे पाटलांनी दिला आहे.

हे ही वाचा:

Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून… हिंडेनबर्गच्या आरोपांवर अदानीच ४१३ पानाचं उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss