spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्यजित तांबे विजय वाटचालीवर

सर्वांचं लक्ष ज्या मतदार संघावर लागून राहिलं होतं त्याचा निकाल आता थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देिला. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र निवडणुकीपूर्वी भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थन केल्यानं निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण झाली होती. आज या जागेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्याच फेरीत सत्यजित तांबे यांनी मोठी आघाडी घेतली. तर दुसऱ्या फेरीत सुद्धा सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या फेरीत सत्यजित तांबे यांना ४५६६० आणि शुभांगी पाटील यांना २४९२७ अशी मत मिळालेली आहेत. तर मिळालेल्या मातांपाहून अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “नाशिक विभागात जे घडलं, खरतंतर माझ्यासारख्यानं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाबाबत बोलणं हे उचित नाही. पण एकेकाळी सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. पक्षाशी बांधिलकी असणारा नवा चेहरा म्हणून पक्षानं जर उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं”

दरम्यान कोकणामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) हे विजयी झाले आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत.

हे ही वाचा:

श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळहून दोन दिव्या शाळीग्राम दगड दाखल, ५१ आचार्यांच्या हस्ते झाले पूजन

जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र ‘मविआ’च्या पाठीमागे ठाम उभा आहे, जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss