शिवसेनेच्या मेळाव्यात राऊतांसाठी खुर्ची आरक्षित

ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे.

शिवसेनेच्या मेळाव्यात राऊतांसाठी खुर्ची आरक्षित

ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही क्षणात मुंबईतील नेक्सो मैदानावर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गटप्रुमखांना संबोधित करणार आहेत. परंतु शिवसेनेच्या आजच्या मेळाव्यात आज खासदार संजय राऊत यांच्या नावाने देखील एक खुर्ची असल्याचे दिसून आले आहे.

हे ही वाचामातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि भारताचे कुबेर यांच्यात तब्ब्ल तासभर चर्चा

 

आज होणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षीत ठेवण्यात आली आहे. या कृतीमुळे संजय राऊत यांच्या पाठीशी आपण आहोत असा संदेश दिला जात आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली असून ते सध्या तुरुंगात आहेत.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील (Patra Chawl Land Scam Case) आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊतच्या जामीन अर्जावर (Sanjay Raut Bail) सुनावणी होणार आहे.

 

आज मेळाव्यासाठी नेस्को ग्राऊंडमध्ये गटप्रमुखांच्या २२ हजार खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. सुमारे ४०० बसेस याठिकाणी येणार आहेत. मुंबईत जवळपास २२७ शिवसेनेच्या शाखा असल्याने मोठ्या प्रमाणात गटप्रमुख, कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील शाखांमधून शिवसैनिकांच्या गाड्या गोरेगाव नेस्कोसाठी निघाल्या आहेत. नेस्को सेंटरच्या गेटवर माजी मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, अनिल देसाई दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुख मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. तर मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्याला आलेल्या गटप्रमुखांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. तसंच ‘बुथ जिंका, मुंबई जिंका,’ अस कानमंत्रही यावेळी गटप्रमुखांना दिला जात आहे.

तसेच ‘ही रंगीत तालीम नव्हे. हा मेळावा पूर्वनियोजित होता. गटप्रमुख ही आमची ताकद आहे. तसेच दसरा मेळावा आमचा नैतिक हक्क आहे” असं वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. गोरेगाव येथे आयोजित नेस्को सेंटरमध्ये ते बोलत होते. तर दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे. तिच कायम राहील. शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर पाहायला मिळणार आहे. हा पहिला गटप्रमुखांचा मेळावा नाही याआधी देखील २००७ साली मेळावा घेतला होता आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीत आम्हाला भरघोस यश मिळालं होतं. असे विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

हे ही वाचा :

‘… बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’, शिवसेनेचा नवा नारा

 

Exit mobile version