पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

आज महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशाना दुसरा दिवस. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकार विरुद्ध विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे पहिले पावसाळी अधिवेशन आहे. ज्याला काल पासून सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आणून सत्तेत नवे सरकार स्थपन झाले, परंतु विरोधकांच्या टीकेची मालिका हि कायम सुरूच आहे. अधिवेनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील नेत्यांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल. दरम्यान आजच्या अधिवेशनाची सुरुवात देखील वादळी घोषणाबाजीने झाली आहे.

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी; तारखेबाबत दिला पर्याय

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे-फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला.

तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्याच बरोबर आगामी ग्रामपंचायत निवडणुका विषयी विधयेक मांडण्यात आली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज विधीमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याच बरोबर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोध्कांकडून करण्यात आली.

हेही वाचा : 

महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक भूमिकेत

Exit mobile version