Sunday, July 7, 2024

Latest Posts

वरिष्ठ नेत्यांनी Pankaja Munde यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून सुचवावे..

'पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठ आणि वरिष्ठ नेतृत्वाने केबिनेट मंत्रिपद द्यावे'

नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आता आलेल्या माहिती नुसार ४६ मंत्री शपथ घेणार आहेत. या नवीन सत्ता स्थापनेत दोन माजी मंत्र्यांना स्थान मिळणार नाही. तर महाराष्ट्रातून एकूण ६ मंत्र्यांची नावे जाहीर झाली आहेत. त्याच प्रमाणे यंदा बीड मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांती पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. त्यामुळे मुंडे समर्थकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदासाठीची (Cabinet Minister) मागणी जोम धरताना दिसत आहे. बीडच्या (Beed) मतदार संघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांची चुरशीची लढत झाली. याच्या निकाल नंतर पंकज मुंढे यांनी निकालामध्ये काहीतरी गड्बड झाली आहे. त्यामुळे मतमोजणी पुन्हा करावी अशी याचिका त्यांनी निवडणुक आयोगकडे केली होती पण त्यांची ही याचिका फेटाळली गेली. त्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आपले सामर्थ्य दाखवू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसल्याचे लक्षात येते. या लढतीत पंकजा मुंढे यांचा एकूण ६,००० मतांनी पराभव झाला. तरीही त्यांच्या साठी मंत्रिपदाची मागणी केली जात आहे.

केंद्रात मोदींच्या शपथविधी नंतर मंत्रिपद विस्तारसुद्धा होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तराच्या पूर्वार्धात बीड शहरासाठी पंकजा मुंडे यांना त्यांची कामगिरी पाहून त्यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेट मंत्रीपद द्यावे.अशी बॅनरबाजी संपूर्ण बिड शहरभर झळकले आहे. पंकजा मुंडे कार्यकर्ते गणेश लांडे (Ganesh Lande) यांनी हे बॅनर्स लावल्याचे सांगितले. त्यांच्या नुसार पंकजा मुंडे या मंत्रीपदासाठी योग्य पात्रतेच्या आहेत. त्याच्यावर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर व्हावा म्हणून त्यांना एखादे पद द्यावे.सर्व कार्यकर्त्यांची पंकजा ताई या मंत्री व्हाव्या यासाठीची त्यांनी आपली मनतव्ये व्यक्त केली आहे.

देशात १८ वी लोकसभा निवडणूक झाली तिचे पडसाद प्रत्येक मतदारसंघाच्या मतमोजणीवर उमटले. बीड मध्ये पंकजा ताई खासदार म्हणून निवडून येतील अशी शक्यता दाट होत असतानाच असे समोर आले बजरंग सोनावणे यांना पंकजा मुंडे यांच्या पेक्षा ६,००० मते अधिक पडली. त्यामुळे सोनावणे हे अत्याधिक मताधिक्याने निवडून आले. परंतु पंकजा मुंडे कार्यकर्त्यांनी जिद्ध सोडली नाही. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधले होते त्या म्हणाल्या की –” जय पराजय हे राजकारणात होतच राहतात, मात्र धीर सोडून चालत नाही.”

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुंडे समर्थकांनी बीड जिल्ह्यातील पाथर्डी व शिरुर बंदची हाक दिली होती. त्यास, प्रतिसाद देत पाथर्डी व शिरुर बंद ठेवण्यात आले होते. आता, परळी बंदची हाक देण्यात आली आहे.मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंडें बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यामुळे तेथे सध्या तणावपूर्ण वातवरण निर्माण झाले आहे. हे प्रकरण चालू असतानाच बीड मध्ये ‘पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठ आणि वरिष्ठ नेतृत्वाने केबिनेट मंत्रिपद द्यावे’ या मागणीचे अनेक बॅनर झळकताना दिसत आहेत. त्याच सोबत बीड मध्ये तणावपूर्ण वातावरण असतानाच पाथर्डी, शिरूर शहरात बंद पुकारण्यात आला आहे. त्यांनतर आज परळी या शहरात सुद्धा बंद पुकारण्यात आला. त्यामुळे तेथे पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Exclusive: शिवसेनेनं गाठलं भगव्या नव्हे हिरव्या विजयाचं लक्ष्य, Muslim मतदार कोणाचे?

PM Narendra Modi यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट; सत्तास्थापनेचं दिलं आमंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss