spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, ८ ते १० दिवसात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार

शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गट चांगलेच आपसात भिडल्याच दिसून येत आहे. तर शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आज जोरदार हल्लाबोल केला आहे. तर येत्या काळात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे असा दावा देखील संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊतांवर टीका करतांना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी शिवराळ भाषा वापरली. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम सुरु केलेलं आहे. संजय राऊतांच्या बडबडीची महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दखल घेत नाहीत याचा अर्थ उद्धव ठाकरेंवर राऊतांचा दबाव आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. ठाकरे गट येत्या ८ ते १० दिवसांत रिकामा होईल, असा खळबळजनक दावा सुद्धा शिरसाट यांनी केला.

तर पुढे शिरसाट यांनी मंत्री मंडळ विस्तारावर (Cabinet expansion) सुद्धा भाष्य केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा पुढचा विस्तार येत्या काळात लवकरच होणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले. महाराष्ट्रामधील मंत्रीमंडळ विस्तार लवकर व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असून, अशी मागणी देखील होत आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास सरकारचा कामाचा वेग वाढेल. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बोललो असल्याचं शिरसाट म्हणाले. मात्र त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असून, येणाऱ्या १५ तारखेपर्यंत त्या अडचणी संपतील. तर फक्त २० लोकांवर मंत्रीमंडळ चालणार नाही ते वाढवावेच लागणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करावेच लागणार असून, ते कुणालाही थांबवता येणार आहे. महाराष्ट्रामधलं मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही?, तर करावाच लागले हे मी ठामपणे सांगतोय असेही शिरसाट म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party) नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी बंडखोरांना जोडे मारतो म्हटलं हे त्यांना शोभत नाही. अंबादास दानवे हे संजय राऊत यांच्या चेल्यासारखे वागत आहेत. शिवसेना डुबवण्याचं काम सुरु आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लावला. अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर कुठलेही आरोप केले नाहीत. ते माझे मित्र आहेत, आणि मुख्यमंत्र्यांना जी तक्रार त्यांनी केली असेल त्यावर मुख्यमंत्री काहीतरी करतील असे शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा:

जोशीमठमध्ये ५६१ घरांना तडे तर जमीनसुद्धा जातेय पाण्याखाली, जाणून घ्या समस्येमागची खरी कहाणी

छत्रीवालीचा ट्रेलर झाला रिलीज, एका नव्या ढंगात रकुल प्रीत सिंग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss