spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

महाराष्ट्र पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलने दिघा आणि ठाणे रेल्वे मार्गावरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. वैभव कदम असे हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. वैभव कदम हे मागील सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा दलात होते.

महाराष्ट्र पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलने दिघा आणि ठाणे रेल्वे मार्गावरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. वैभव कदम असे हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. वैभव कदम हे मागील सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा दलात होते. अनंत करमुसे प्रकरणाबाबत वैभवचीही चौकशी करण्यात येत होती. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वैभव कदम यांच्या निधनाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर आता या प्रकरणात मोहित कंबोज यांनी देखील उडी घेतली आहे.

 अनंत करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी वैभव कदम याने दर्शवली होती. परंतु आता अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. पोलिस कॅान्स्टेबल वैभव कदम याची हत्या झाल्याचा मोहित कंबोज यांचा आरोप आहे. तसेच मोहित कंबोज यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. हा एपिसोड आत्महत्येचा नसून खुनाचा आहे, असा दावा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. कंबोज यांनी एक पोस्टही शेअर केली असून, ती वैभव कदम यांची शेवटची पोस्ट असल्याचं म्हटलं जात आहे.ज्यामध्ये लिहिले आहे की, “पोलिस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे की मी आरोपी नाही.”

काय आहे अनंत करमुसे प्रकरण?

ठाण्यात राहणारे अनंत करमुसे यांनी तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मॉर्फ केलेले छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. अनंत करमुसे अपहरण आणि प्राणघातक हल्ला प्रकरणात जितेंद्र आव्हाडला अटक करण्यात आली होती. आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाण्यातील ४० वर्षीय अनंत करमुसे यांनी आरोप केला की ५ एप्रिल २०२० च्या रात्री काही पोलिस त्यांना आवाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

हे ही वाचा : 

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी थेट पोहोचले संसदेत

पाणी जपून वापरा, मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणी कपात

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss