spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पक्षाने जर आदेश दिला तर थेट कर्नाटकात जाईन, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य

शिवसेनेत बंड करून शिंदे गटात सामील झालेले शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) हे पुन्हा एकदा नव्या वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. शहाजी बापू पाटील यांनी महाराष्ट्र – कर्नाटक(महाराष्ट्र-कर्नाटक) सीमेवर नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. पक्षाने आदेश दिला तर मी थेट बेळगावात (Belgaum) जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला अभिवादन करून येईन. फक्त पक्षाने तसा आदेश द्यायल हवा.. असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केलं आहे.

दिव्यांग दिनानिमित्ताने (disabled day) संवाद दिव्यांगांशी या कार्यक्रमात शहाजी बापू पाटील उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न पुन्हा समोर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महारष्ट्रामधल्या काही गावांवर आपला दावा सांगितला आहे. तर महाराष्ट्रातील अनेक गावांनीही कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. समन्वय समितीमार्फत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना स्पष्ट नकार दिला. तसं पत्र कर्नाटक सरकारकडून काल महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहाजी बापू पाटील यांनीही यावर सदर प्रतिक्रिया दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे दोन मंत्री शनिवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र तत्पुर्वी शुक्रवारीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं. सीमाभागातील गावांमध्ये सध्या तणावाचं वातावरण असल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातील मंत्र्यांना एक प्रकारे रोखण्याचीच भाषा कर्नाटक सरकारने केल्याने राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आम्ही येऊ नये, असे कर्नाटक सरकारने कळवलं असलं तरीही बेळगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही ६ डिसेंबर रोजी जाणारच, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

हे ही वाचा : 

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आता पर्यंत झाले ३१.२७ कोटी खर्च

दृश्याम २ च्या यशाबद्दल बोलताना तब्बूने केला ‘हा’ खुलासा

११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचं उद्घाटन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss