Shahaji Bapu Patil : ‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, भर सभेत शहाजी पाटलांचा दावा

Shahaji Bapu Patil : ‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, भर सभेत शहाजी पाटलांचा दावा

काय डोंगर, काय झाडी एकदम ओके या गुवाहाटीमध्ये केलेल्या वक्तव्यावर जगभर प्रसिद्धी मिळालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्या खास रांगड्या भाषेसाठी ओळखले जातात. आताही त्यांनी अशाच त्यांच्या रोखठोक आणि हटके शैलीत राज्याच्या राजकारणातील दोन राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत आणि विनायक राऊतांवर शहाजीबापूंनी निशाणा साधलाय. भाजपचे नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते. तेव्हा त्यांनी जोरदार बॅटिंग केली.

Sushma Andhare : ‘सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा’ शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची खोचक टीका

शहाजीबापू काय म्हणाले?

दोन राऊतांवर माझा लई राग हाय…या दोन राऊतांनी आमचं सगळं वाटोळं केलंय, असं म्हणत शहाजीबापूंनी यावेळी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीला कोकणात येऊन धुरळा पाडणार.निलेश राणे तुम्ही येऊ नका म्हणालात तरी मी येणार… संजय राऊत निवडणुकीला उभा राहत नाही नाहीतर तिथं पण गेलो असतो. राऊतांचा निवडणुकीततील पराभव अटळ आहे, असं शहाजीबापू म्हणालेत.

हेही वाचा : 

Diwali 2022 : यंदा दिवाळी मध्ये धमाकेदार ऑफर, घ्या स्वस्तात कार

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “अंधेरी पोटनिवडणुकीची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी सोडली आहे. या जागेवर युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार असून त्यांनी गेले तीन महिने काम केलेले असून त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मतं पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आलीय.”, बोलत असतानाच विजय मुरजी पटेल यांचाच अंधेरी पोटनिवडणुकीत विजय होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

“ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तेव्हापासून राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची गणित चालू झाली आहेत, आगामी काळात अजूनही वेगवेगळी गणितं आणि आराखडे बघायला मिळतील.”, असंही शहाजीबापूंनी सांगितलं आहे.

शिंदे सरकारमधील अस्वस्थतेवर अजित पवारांनी साधला निशाणा म्हणाले, ‘थोडं थांबा, सुरू झालंय…’

Exit mobile version