Thursday, July 4, 2024

Latest Posts

Vasant More बांधणार शिवबंधन ? ; भेटीत काय घडले

याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे (Vasant More) आता पुण्यातील आज म्हणजेच ४ जुलै २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होते. ही भेट आज मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता होणार झाली.

राजकीय नाट्यात नवे नवे बदल घडत आहे. काही नवनवीन घडामोडी जनतेच्या निद्रशनास येत आहेत. आता पर्यंत चाललेल्या राजकीय नट्यात आता आले आहे नवे वळण. हे वळण आता कोणत्या रस्त्यावर घेऊन जाते ते पाहावे लागणार आहे. हाती आलेल्या बातमी नुसार वसंत मोरे आता तिसऱ्यांदा आपला रास्ता बदलणार आहेत अशी चर्चा राजकीय विश्वात घडत आहेत.

एकंदरीत राजकीय वर्तुळात युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्यच असते. असे वातावरण राजकारणात निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. वसंत मोरे हे विशेष चर्चेत राहिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे (Vasant More) आता पुण्यातील आज म्हणजेच ४ जुलै २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होते. ही भेट आज मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता होणार झाली. या भेटीत काही नवीन वृत्त समोर आली आहे. आता वासंत मोरे यांची उबाठा गटात एन्ट्री होणार आहे. आज ते संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते.

दरम्यान त्यांच्यात व उद्धव ठाकरे यांच्यात महत्वपूर्ण चर्चा रंगली. त्यांनतर वसंत मोरे यांना शिवसेनेची कवाड आता खुली झाली आहेत. दरम्यान त्यांचा पक्षप्रवेश निश्चित तर झालाच आहे. सोबतच त्यांना शिवबंधन बांधण्याचा मुहूर्तसुद्धा मिळाला आहे. वसंत मोरे हे येत्या ९ जुलै २०२४ रोजी अधिकृतरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांची मनसेतली नाराजी विषयी भाष्य राजकीय वर्तुळात चालत होते. त्यावर हे ठळक पाऊल त्यांनी उचलले आहे. यावर भाष्य करताना त्यांनी आपले मत माध्यमांकरवी लोकांपर्यंत पोहचवले आहे.

काय म्हणाले वसंत मोरे जाणूयात सविस्तर : 

“मी वंचित मध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही, माझा परतीचा प्रवास आता शिवसेनेकडे होतोय.उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल माझे स्वागत केलं. पण मी यायला उशीर केला असं ते म्हणाले. आता मी पक्ष प्रवेश करणार आहे. मी वंचित मध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो आणि आता पुन्हा  माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतोय. आता पुणे महानगरपालिकेसाठी मी शिवसेनेकडून आवाहन स्वीकारले आहे. तस पाहायला गेलं तर, एकंदरीत मला दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून लढू शकतो . पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता तरीही मला तिथे चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना दाखल झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहणार. शिवसेना हा असा पक्ष आहे की शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे. १० नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे.” असे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे.

एकंदरीतच या राजकीय नाट्यात एक नवे पात्र आले आहे. त्यामुळे शिवसेनेला आणि सोबतच राज्याला काय नवीन वसंत मोरे यांच्या कडून प्राप्त होत आहे. हे पाहणे विशेष महत्वाचे व औत्सुक्याचे ठरणार आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss