शिंदेंना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिलेली, सुहास कांदेंच्या गंभीर आरोपाला शंभूराजे देसाईंचा दुजोरा

शिंदेंना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिलेली, सुहास कांदेंच्या गंभीर आरोपाला शंभूराजे देसाईंचा दुजोरा

सुहास कांदेंच्या गंभीर आरोपाला शंभूराजे देसाईंचा दुजोरा

नाशिक : शिवसेना नेते व माजी आरोग्य मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा सुरू केल्यानंतर पाठोपाठ शिंदे गटातील बंडखोर आमदार सुहास कांदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. “आम्ही गद्दारी केली नाही, पक्षातून उठलो नाही, तर नेत्या विरोधात उठाव केला आहे. तुमचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही” अशा शब्दात सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना आवाहन दिले. नाशिक जिल्ह्यातील मनमाड मध्ये जनतेला संबोधित करताना ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

आमदार सुहास कांदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. यावेळी नक्षलवाद्याकडून शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला. त्यामुळे गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन गृहमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा देण्यास मनाई केली असा दावा सुहास कांदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावरून सुरक्षा नाकारण्यात आली हिंदुत्वांना सुरक्षा नाकारून हिंदुत्वविरोधी पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा देण्यात आली असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला.

सुहास कांदे यांच्या आरोपाला शंभूराज देसाई यांनी दुसरा देत म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांचे धमकी पत्र आले होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षित व्यवस्थित वाढ करण्याची गरज होती सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याला विरोध केला असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज रात्री दिल्ली दौऱ्यावर, खातेवाटपावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता

Exit mobile version