spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शंभूराज देसाई यांनी केली मोठी घोषणा

राज्यात सध्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली.

राज्यात सध्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मनं दुखावली आहेत, याचा खुलासा नुकतचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठी माहिती दिली आहे. शंभुराज देसाई पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी माहिती दिली.

गेल्या दोन दिवसात झालेल्या आणि अजूनही चालू असलेल्या जाहिरातीच्या राजकारणावरून काही बडे नेते नाराज आहे असे दर्शविले जात आहे. आणि त्याचबरोबर या जाहिरातीमुळे पक्ष पक्षामध्ये अजून नवे वाद निर्माणहोयाला नको म्हणौन शंभूराज देसाई यांनी मध्यस्ती करून हा वाद संपुष्ठात कसा येईल याकडे लक्ष केंद्रित केलं आहे.तसेच त्यांनी या मधू बाहेर पाडण्यासाठी सुवर्ण मध्य देखील सुचवला आहे. विषय संपवू आणि २०२४ च्या कामाला लागू. सामंज्यासाच्या भूमिकेतून पुढे जाऊ. पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठांची समन्वय समिती करु. अस यावेळी शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन शिंदे गट आणि भाजप आमदार खासदार यांच्यात वाद सुरु आहे. अशातच ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो झळकले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात आलं होतं. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, असंही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा:

खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना

गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी; २४ तासांत धडकणार चक्रीवादळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss