spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये राष्ट्रवादीचं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

National Unity Day : देशातील दिग्गज नेत्यांकडून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली केली अर्पण

राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल.” त्यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील, असंही निवेदनात म्हटलं आहे. ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.

Maharashtra Politics : ‘मी दिलेले शब्द मागे घेतो…’ ; शिंदेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला

शरद पवारांवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया

मागील वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना ३० मार्च रोजी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचं निदान झालं होतं. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले.

सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

Latest Posts

Don't Miss