‘ते’ घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात; अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा

शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता. आमदारांची संख्या जास्त असल्याने आमचाच पक्ष मोठा आहे", असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

‘ते’ घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात; अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा

अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरु आहे. तर, शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत.

“एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं. शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता. आमदारांची संख्या जास्त असल्याने आमचाच पक्ष मोठा आहे”, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर आज सुनावणी सुरू असून अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे.

अजित पवार गटाकडून असा दावा करण्यात येत आहे की, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्यासोबत असून त्यांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्ष आणि चिन्ह कुणाचे, याचा निर्णय कार्यकर्ते घेतील असं अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं.

अजित पवार गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर नंतर शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या ५३ पैकी ४२, विधानपरिषदेचे ९ पैकी ६ आणि नागालँडमधील ७ असे ५५ आमच्या पाठिशी, तर लोकसभेत ५ पैकी १ आणि राज्यसभेतील ४ पैकी १ खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा मागील सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला होता.

हे ही वाचा: 

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; डोंबिवलीतील रॅकेट उद्ध्वस्त

रविवारी कांगारू पस्तावले, विजयी Team India तून शुभमनसाठी कोणाला वगळणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version