शरद पवार देवेंद्र फडणवीस ‘या’ कार्यक्रमासाठी एकाच मंचावर

शरद पवार देवेंद्र फडणवीस ‘या’ कार्यक्रमासाठी एकाच मंचावर

सध्या महाराष्ट्रामधलं राजकारण खूप तापल्याच दिसून येत आहे. पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं.पतंगराव कदम यांच्या नावाचा पहिला पुरस्कार आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना आज देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, पतंगराव हे अतिशय आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. सांगली जिल्ह्यातील (Sangli district) एका गावातून आले होते. रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका या योजनेअंतर्गत ते शिकले. पुण्यात आले आणि भारती विद्यापीठ सारखी शिक्षणसंस्था उभी केली.

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकाच मंचावर आले आहे. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (Bharti Superspeciality Hospital) आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उद्घाटन समारंभ होत आहे. या कार्यक्रमाला शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही एकाच मंचावर उपस्थित आहेत.

दरम्यान यावेळी बोलताना फडणवीस यांनी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीमावादाबाबत कुठलेही शंका असल्याचे कारण नाही. सीमावादाबाबत सरकार खूप गंभीर आहे. तर सीमावाद प्रकरणात आम्ही हरिष साळवे यांची नियुक्ती करण्याचा विचार करत असून, त्यांचाशी संपर्क साधला आहे. ते देखील आपल्या बाजूने उभे राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपली केस मजबूत असल्याचं फडणवीस म्हणाले. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी पवार आणि फडणवीस हे एकाच गाडीतून आले. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Himachal Pradesh Chief Minister Sukhwinder Singh Sukhu) उपस्थित राहणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. सध्या राज्यात विविध विषयांवर वाद निर्माण झाले असताना, पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा:

शिक्षिकेने वर्गात केला शिव तांडव, वर्गातली मुलेही थिरकली…

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version