spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ओबीसी आरक्षण बाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली अन् म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाने गेला काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला की आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होतील.

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने गेला काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला की आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होतील. त्यानंतर काल पुन्हा राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दणका देत जाहीर झालेल्या निवडणुका आहेत, त्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणेच पार पडतील. त्याला ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. असा निर्णय दिला. मात्र त्यानंतर आता राज्य सरकारची यंत्रणा पुन्हा जोमत तयार झाली आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारची पुन्हा धावाधाव सुरू झाली आहे. याबाबत आज राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी नाशिक मधून एक मोठे विधान केले आहे.

शरद पवार म्हणाले…

ओबीसी आरक्षणाचा निर्णय हातात आल्याशिवाय त्यावरती भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण एकंदरीत या संदर्भात वाचल्यानंतर परिस्थिती चिंताजनक असल्याचे लक्षात येते. फार मोठा वर्ग या सगळ्यातून सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर जाईल अशी चिंता वाटते. असे पवार यांनी मत व्यक्त केले.

भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही,असे भाकीत व्यक्त करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या भाष्यवार शरद पवार म्हणाले, ता ते त्यांना विचारा मी काय सांगू?” “संजय राऊतांवर मी कशाला कमेंट करु?” असे ही पवार म्हणाले.

हेही वाचा : 

एक व्हिलन रिटर्न्स रिव्ह्यू : चित्रपटात सस्पेन्सचा खेळ

Latest Posts

Don't Miss