spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?”  शरद पवारांनी मांडले आपले परखड मत

पुणे :  शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसह अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान शरद पवार यांनी आपल्या भाषणात काही मुद्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, “महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला, असे पवार यांनी म्हटले.

शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?

पुढे पवारांनी म्हटले “अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. मात्र रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, असं पवार म्हणाले. पुरंदरेंनी जे काही लिखाण केलं, जी काही मांडणी केली, ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. काही व्यक्तींचे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसून येते”, असेही पवार म्हणाले.

यावेळी नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर बैठकही घेऊ, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : 

‘मी वसंतराव’साठी राहुल देशपांडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Latest Posts

Don't Miss