spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘भ्रष्टाचाराचा राजा’ म्हणताच… अमित शहांवर शरद पवार संतापले, म्हणाले ज्याला गुजरातमधून हाकलून दिले…’,

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना 'भ्रष्टाचाराचा राजा' म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी चांगलाच पलटवार केला आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ‘भ्रष्टाचाराचा राजा’ म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी चांगलाच पलटवार केला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांच्या गृहराज्य गुजरातपासून दूर राहण्यास सर्वोच्च न्यायालयाने कसे भाग पाडले याची आठवण करून दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अमित शहांवर जोरदार हल्लबोल हा केला आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, ‘काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर हल्ला केला होता आणि काही गोष्टी बोलल्या होत्या. त्यांनी मला ‘देशातील सर्व भ्रष्ट लोकांचा सेनापती’ असे संबोधले. गृहमंत्री हा गुजरातच्या कायद्याचा गैरवापर करणारी व्यक्ती आहे आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची गुजरातमधून हकालपट्टी केली हे विचित्र आहे. ते पुढे म्हणाले, ‘ज्याची हकालपट्टी झाली ते आज गृहमंत्री आहेत, त्यामुळे आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार करायला हवा. ज्यांच्या हातात हा देश कसा चुकीच्या मार्गावर चालला आहे, याचा विचार करायला हवा. अन्यथा ते देशाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातील, असा मला 100% विश्वास आहे. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

२०१० मध्ये, अमितला सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणात दोन वर्षांसाठी त्याच्या गृहराज्यातून हद्दपार करण्यात आले होते. २०१४ मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. २१ जुलै रोजी, महाराष्ट्रातील पुण्यातील भाजपच्या परिषदेत गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते, ते (विरोधक) भ्रष्टाचारावर बोलत आहेत. शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे किंगपिन आहेत आणि मला त्याबद्दल कोणताही भ्रम नाही. आता ते आमच्यावर काय आरोप करणार? भ्रष्टाचाराला संस्थात्मक बनवण्याचे काम जर कोणी केले असेल तर शरद पवार तुम्हीच आहात.

Latest Posts

Don't Miss