साताऱ्यातून कोणाला मिळणार उमेदवारी? सिल्वर ओकवर Sharad Pawar यांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी कोण निवडणूक लढवणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी बैठक घेण्यात येत आहे.

साताऱ्यातून कोणाला मिळणार उमेदवारी? सिल्वर ओकवर Sharad Pawar यांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात महायुती (Mahayuti) तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यातील जागावाटपावरून तिढा कायम आहे. महाविकास आघाडीमधून सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे श्रीनिवास पाटील यांना (Shrinivas Patil) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणावरून हि लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. म्हणून या जागेवरून आता कोण निवडणूक लढवणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक घेण्यात येत आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नव्याला उमेदवाराची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सारंग पाटील (Sarang Patil) यांच्यासह श्रीनिवास पाटील हेसुद्धा उपस्थित आहेत.

श्रीनिवास पाटील हे जरी निवडणूक लढवण्यास इच्छूक नसले तरीही त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडावी यासाठी ते आग्रही आहेत, असे बोलले जात आहे. याशिवाय शशिकांत शिंदे यांनी देखील पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरून महायुतीविरुद्ध निवडणूक लढण्याची उच्च दर्शवली होती.. त्यामुळे, सातारा लोकसभा मतदारसंघातील या जागेवर राष्ट्रवादीतुन कोणाला उमेदवारी मिळते हे लवकरच पहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

Sanjay Nirupam यांचा Congressला बाय बाय… Loksabha Elections पूर्वी MVAला मोठा धक्का

हिंगोलीत महायुतीने उमेदवार बदलला, Hemant Patil ऐवजी Baburav Kadam Kohalikar यांना उमेदवारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version