spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खुद्द ‘शरद पवार’ उतरले मैदानात

राज्यातील राजकारणात मोठी उलथापालक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झालेले आहेत.

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झालेले आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची मोठी अडचण होणार असल्याचे दिसत आहे. त्यातच एका मागोमाग एक शिवसेनेचे आमदार माजी नगरसेवक व पदधिकारी हे शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची युती आता कोणासोबत ? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता ‘मिशन मुंबई महानगरपालिका’ यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय नेत्यांची बैठक घेतली. मी वार्डातही प्रचारासाठी येईल असा विश्वास आपल्या पदधिकाऱ्यांना शरद पवार यांनी दिला.

 राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांविषयी आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले आहे. तसेच महानगरपालिका निवडणुकीसाठी आता आपल्या सोबत कुणी येवो न येवो याचा विचार करत बसू नका तयारीला लागा असे स्पष्ट निर्देश शरद पवार यांनी अधिकाऱ्यांनी वाढ अध्यक्षांना दिले आहेत.

 आतापासून दर 20 दिवसांनी शरद पवार मुंबईतील परिस्थितीचा अध्यक्षांकडून आढावा घेणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचारातही ते उतरणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आपला झेंडा फडकवण्याची संधी आहे असे कार्याध्यक्षांना त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

‘लहान मुलाची समजूत फडणवीस काढतील’ केसरकरांच्या वक्तव्यावर निलेश राणेंचे प्रत्युत्तर

Latest Posts

Don't Miss