Sharad Pawar : “शिवसेना संपणार नाही तर…” सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

अखेर शनिवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाला या चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत करता येणार नाहीये.

Sharad Pawar : “शिवसेना संपणार नाही तर…” सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

अखेर शनिवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाला या चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत करता येणार नाहीये. तसेच शिवसेना (Shivsena) हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, पण असंच घडेल असं माझं मन मला सांगत होतं. ज्याची भिती होती तोच निर्णय देण्यात आला. आता चिन्ह असो किंवा नसो पण उद्धव ठाकरेंनी निवडणुकांना पुढे जाण्याची तयारी दाखवली पाहिजे, कारण मी ही वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढलो. या निर्णयामुळे शिवसेना तर अजिबात संपणार नाही, ती अजून जोमाने उभी राहील” असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यावर व्यक्त केलं आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“निवडणूक चिन्हाचा निर्णय आला असला तरी महाविकास आघाडी फुटणार नाही, आम्ही सोबत असणार आहोत. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं असू शकते, कारण काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हाही दोन नावे देण्यात आले होते. सत्तेचा गैरवापर करून कुणी निवडणुका लढवत असेल तर ते लोकांना आवडत नाही” असाही टोला शरद पवारांनी भाजपवर लावला आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” या नावाचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे पुन्हा पेच निर्माण झाला असून कोणते नाव कोणत्या गटाला मिळणार याकडे लक्ष लागलेल आहे. तर ज्याची भिती होती तोच निर्णय निवडणूक आयोगाने दिला अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गट आणि भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पूर्वी शिवसेनेतून जे बाहेर पडले ते कधीही शिवसेनेच्या मुळावर उठले नाहीत. मात्र शिंदे गट शिवसेनेच्या मुळावर उठला आहे. परंतु उद्धव ठाकरे हे सक्षम नेतृत्व असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आपली आणि पक्षचिन्ह आपलंच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. तर आता निवडणूक आयोगाने शनिवारी निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. त्याचबरोबर शिवसेना नावही कुणालाच वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी दुसरे चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाने केलीआहे.

हे ही वाचा:

लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न… दीपक केसरकरांची ठाकरे गटावर टीका

निवडणूक आयोगाचा ‘हा’ अंतिम निर्णय नाही – उज्ज्वल निकम

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version