राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवारच, एकमताने ठराव करण्यात आला मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवारच, एकमताने ठराव करण्यात आला मंजूर

राष्ट्रवादीच्या कार्य समितीत एकमताने ठराव मंजूर केल्यामुळे यावेळीसुद्धा राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे आज पार पडले. याच अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

आज कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत आदरणीय शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करू, असे ट्विट विकांत वरपे यांनी केले आहे.

कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड केली गेली. तर, या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचा नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूरी देण्यात आली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, चंद्रकांत पाटीलांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या आधी सचिन तेंडुलकरचे झाले कानपूरमध्ये जबरदस्त स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version