Sharad Pawar कराडसाठी रवाना, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं घेणार दर्शन

काल दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामॊठी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे.

Sharad Pawar कराडसाठी रवाना, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं घेणार दर्शन

काल दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामॊठी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. शरद पवार आज साताऱ्याच्या (Satara) दौऱ्यासाठी रावण झाले आहेत

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कराडमध्ये यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा आशीर्वाद घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. स्वत: शरद पवार यांनी या दौऱ्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा रान उठवणार आहे.

काल दिवसभर चालू असलेल्या राजकीय नाट्यानंतर शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, तेवढं करेन, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हेच धोरण आहे.”

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बंडात अजित पवारांसोबत आहेत. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय, विश्वासू मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे आतापर्यंतच सर्वात मोठ बंड आहे. अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, ते स्पष्ट झालेलं नाहीय. काल राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आपण अजूनही शरद पवार यांच्यासोबतच असल्याच सांगितलं.

शरद पवार यांचा सातारा दौरा –

सकाळी ८ वाजता : पुण्याहून निघणार
सकाळी ११ वाजता : साताऱ्यातील कराडमध्ये आगमन
सकाळी ११ ते ११ .३० वाजता : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचं दर्शन
सकाळी ११ .१५ वाजता : कराडहून निघणार
दुपारी १२ वाजता : साताऱ्याला पोहोचणार
दुपारी १२ ते १ वाजता: रयत शिक्षण संस्थेची बैठक
दुपारी १ ते १.४५ वाजता: विश्राम
दुपारी २ वाजता : पश्चिम महाराष्ट्र मातंग परिषदेला उपस्थिती
दुपारी ३.३० वाजता: साताऱ्याहून निघणार
रात्री ८.३० वाजता: मुंबईत आगमन

हे ही वाचा:

Ajit Pawar, नव्या उपमुख्यमंत्र्यांचा ४१ वर्षांचा राजकीय प्रवास घ्या जाणून, ५ वेळा उपमुख्यमंत्री…

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version