spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

न्यूमोनियाचा आजार, हाताला बँडेज, शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मेळाव्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या शिर्डी इथं सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या शिर्डी इथं सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता शिर्डीसाठी रवाना झाले आहेत. पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शिबीर संपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होतील.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे आजही देशातील सर्वच तरुण आणि बुजुर्ग राजकारण्यांसाठी आदर्श राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यातून, अफाट बुद्धिमत्ता, अभ्यास आणि लोकसंपर्कातून शरद पवारांनी हे वेळोवेळी सिद्धही केलं आहे. मागच्यावेळी वयाच्या ८० व्या वर्षीही शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली अन् साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीचा (loksabha election) गेम पालटला. पवारांची ही सभा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. आताही पवारांच्या कर्तव्य निष्ठतेचं हे रुप पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार घेत असताना त्यांनी मध्येच डिस्चार्ज घेतला असून थेट पक्षाच्या मेळाव्यासाठी शिर्डीत (shirdi) दाखल झाले आहेत. वयाच्या 81व्या वर्षीही आजाराची पर्वा न करता पवारांनी दाखवलेल्या या उत्साहाची एकच चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांना पाच दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांसाठी ते रुग्णालयात भरती झाले होते. त्यामुळे या तीन दिवसातील कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. भेटीगाठी टाळल्या होत्या. मात्र, उपचार घेऊन शिर्डीतील पक्षाच्या मंथन मेळाव्याला जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं. काल राष्ट्रवादीचं शिर्डीत दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू झालं. आज या शिबीराचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. काल पवारांना डिस्चार्ज मिळणं अपेक्षित होतं. डिस्चार्ज मिळाल्यावर ते शिर्डीला जाणार होते. पण डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला नाही. त्यामुळे पवारांनी रुग्णालयातून आज डिस्चार्ज घेतला. शिर्डीतील शिबीराला संबोधित करण्यासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला. शिबीर आटोपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत.

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट महालक्ष्मी रेसकोर्सकडे निघाले. तिथून हेलिकॉप्टरने त्यांनी शिर्डीकडे मार्गक्रमण केलं. यावेळी त्यांच्या दोन्ही हाताला पट्टया बांधलेल्या दिसून आल्या. यावेळी शरद पवार यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही असेल. तिथे त्यांच्या आरोग्यवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.

या शिबिरात ते समारोपाचे भाषण करणार आहेत. त्यामुळे पवार या शिबीरात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भाषणात पवार केंद्रावर हल्ला करतात की राज्यातील सरकारवर याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा :

Red Chilli : लाल मिरची महागणार! मिरची राजधानी म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या पाकिस्तानला मोठा फटका

चंद्रकांत खैरेच्या पक्ष फोडी वक्तव्यांवर नाना पाटोल्याचं प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss