आज Sharad Pawar – Amit Shah यांच्यामध्ये भेट होण्याची शक्यता

सध्या राज्यात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत. तर संसदेत देखील अधिवेशन हे चालू आहे राज्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्दे हे चांगलेच रंगत आहेत.

आज Sharad Pawar – Amit Shah यांच्यामध्ये भेट होण्याची शक्यता

सध्या राज्यात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत. तर संसदेत देखील अधिवेशन हे चालू आहे राज्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्दे हे चांगलेच रंगत आहेत. शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण जास्त गरम झाल्याचे चित्र दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकरी देखील ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (National Congress President Sharad Pawar) हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्या संदर्भात भेट घेऊन साखर कारखानदारांची समस्या मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.

राज्यात निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या संदर्भात भेट घेत साखर कारखानदारांची समस्या मांडणार आहे. या निर्णयाचा मोठा फटका हा साखर कारखादारांना बसणार आहे. त्या संदर्भात भेट घेत निवेदन देणार आहे. राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. आज दिनांक १५ डिसेंबरला अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेणार आहे. रात्री १० वाजता ही भेट होणार असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली. राजेश टोपे देखील अमित शहांच्या भेटीसाठी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. अमित शाहांसोबत कालच बैठक होणार होती. मात्र लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेल्या गदारोळामुळे काल भेट झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय… संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version