Sharad Pawar Live : शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचा सत्कार

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

Sharad Pawar Live : शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचा सत्कार

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताब पटकवणारा शिवराज राक्षे (Shivraj akshe) याचा सत्कार केला आहे. याच वेळी शरद पवार यांनी शिवराज राक्षे ययाचे अभिनंदन देखील केले आहे. महाराष्ट्र केसरी राक्षे याचा शरद पवार यांनी शिंदे शाही पगडी देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, काही कामामुळे काल महाराष्ट्र केसरीच्या फायनलला जाता आलं नाही.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अनेक खेळाडूंना मदत केली आणि करतोय. आज सांगतोय गाजावाजा करत नव्हतो. मी आणि आमची भावकी हे काम करत होतो. मी शेवटची कुस्ती बघत होतो. कर्तृत्व दाखवलं शिवराज आणि जिंकला. महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे, यानंतर सगळं आहे, असे शरद पवार म्हणाले. आजचा दिवस काशबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. पण त्यानंतर कोणीही कुस्तीमध्ये पदक मिळवले नाही. शिवराजने पदक जिंकावी, त्याला हवी ती मदत करु, असे शरद पवार म्हणाले.

तसेच पुढे शरद पवार यांनी नाशिक पदवीधर निवडणुकांवरदेखील भाष्य केले आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. काँग्रेसनं याबाबत आधीच चर्चा करायला हवी होती. बाळासाहेब थोरात टोकाची भूमिका घेत नाहीत. चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत विचारलं असता… कुणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा अधिकार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांनी ऐनवेळी फॉर्म भरला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

हे ही वाचा:

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version