मोदी – शाह यांच्या दौऱ्यावर शरद पवारांची खोचक टीका

काल दि. १० फेब्रुवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचा १ महिन्याच्या आत दुसऱ्यांदा मुंबई दौरा हा झालं आहे.

मोदी – शाह यांच्या दौऱ्यावर शरद पवारांची खोचक टीका

काल दि. १० फेब्रुवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचा १ महिन्याच्या आत दुसऱ्यांदा मुंबई दौरा हा झालं आहे. अनेक प्रकारच्या विकास कामासाठी नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. पारंतू त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून सडकून टिका केली जात आहेत. तर दुसरीकडे अमित शहा यांचे देखील महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. तसेच मुंबई आणि पुण्यात महापालिकांच्या निवडणुका या जवळ आल्या आहेत. तर आता पुण्यात पोट निवडणुका देखील येऊ घातल्या आहेत. त्यामुळे मोदी आणि शहांचे दौरे हे वाढले आहेत का ? अश्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया ही व्यक्ती केली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार हे टीका म्हणाले आहेत की, मोदी आणि शाह यांना राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या वाटत असाव्यात. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा मुंबई – पुणे दौरा करत आहेत. पण हरकत नाही. त्यांनी यावं. महाराष्ट्राला काही देणार असतील, महाराष्ट्राचं हित असेल तर विरोध करण्यास करण्याची गरज नाही. पण येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तर शरद पवार यांनी अमित शहांच्या पुणे दौऱ्यावर देखील खडसून टीका केली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीसाठी पुण्यात दोन दोन दिवस घालवावे लागतात याचा अर्थ आमच्या कार्यकर्त्यांची कामे चांगली सुरू आहेत, असा चिमटा पवार यांनी काढला.

तसेच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील मोदींच्या दौऱ्यावर जोरदार तिला केली आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, “जोपर्यंत महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत राहू शकतो. कारण पालिका जिंकण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातले भाजपा आणि मिंधे गटाचे लोक असमर्थ आहेत. ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा इतर राज्यांत त्यांनी लावला तसा आख्खा देश जरी इथे लावला, तरी मुंबई महानगर पालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळेच आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय”, असं संजय राऊत म्हणाले. “ते आहेत देशाचे पंतप्रधान आणि लक्ष कुठंय तर मुंबई महानगर पालिकेवर. याचा अर्थ इथले सगळे भाजपा आणि मिंधे गटाचे नेते नाकर्ते आहेत. म्हणून पंतप्रधानांना बोलवलं आहे. कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. राजभवनात राहतील”, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लागावाला आहे.

हे ही वाचा : 

Raj Thackeray यांचा आज औरंगाबाद दौरा

Valentine Day 2023, मुंबईतील ‘या’ हॉटेल्समध्ये करा रोमँटिक डेट प्लॅन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version