Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? Sharad Pawar यांचं थेट उत्तर

मविआचा मुख्यमंत्री कोण असणार ?याप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेटपणे आपली प्रतिक्रिया दिली. 

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024 ) रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्याच्या राजकीय पक्षाना विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे आणि याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. आपल्या पक्षाने चांगली कामगिरी केली पाहिजे यासाठी महायुती(mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) चांगली तयारी सुरु झाली आहे. जागावाटपापासून ते योग्य उमेदवार निवडीपर्यंत सर्व पक्षांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता मुख्यंमंत्री पदाचा दावेदार कोण असणार यावरुन महाविकास  आघाडीत खडाजंगी पाहायला मिळत आहे. मविआचा मुख्यमंत्री कोण असणार ?याप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेटपणे आपली प्रतिक्रिया दिली.

आज सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते असं म्हणाले की, “आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. सामूहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र आहे.”असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात का ? असा प्रश्न विचारला असता “सामूहिक नेतृत्त्व हा आमचा चेहरा आहे.”असं शरद पवारांनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहुनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल.”असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवा असे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर मविआत वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं.

मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत मविआतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (Rashtravadi Sharadchandra pawar)गटाच्या काही आमदारांनी आपलं मत देखील व्यक्त केलं होतं. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा असणार असा देखील दावा कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून देखील “जो काही निर्णय होईल तो एकत्र बसून घेऊ”असं सांगितलं जरी असलं तरी देखील मुख्यमंत्रीपदावरुन मविआत अजूनही वाद-विवाद सुरु असल्याचं दिसत आहे.

Latest Posts

Don't Miss