जालना लाठीचार्ज प्रकरणी कुणी सूचना दिल्या, यासंदर्भात शरद पवार यांनी उठवला सवाल…

'मला फक्त एवढंच माहिती आहे की, तिथं लाठी हल्ला झाला, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दिसत आहे की पोलीस कर्मचाऱ्यांकडून लाठीहल्ला होत आहे.

जालना लाठीचार्ज प्रकरणी कुणी सूचना दिल्या, यासंदर्भात शरद पवार यांनी उठवला सवाल…

‘मला फक्त एवढंच माहिती आहे की, तिथं लाठी हल्ला झाला, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दिसत आहे की पोलीस कर्मचाऱ्यांकडून लाठीहल्ला होत आहे. “कुणी सूचना दिल्या, का दिल्या, त्याच्या खोलात जाणं सरकारचं काम आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं, कारण ते त्यांच्या हातात आहे, आम्हा लोकांच्या हातात नाही,” असा सवाल करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

दोन-तीन दिवसांपासून जालना (Jalna) येथील घटनेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सामान्य नागरिकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच काल मुख्यंमत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाठीचार्जमध्ये आमच्यापैकी कुणाचा हात असल्यास ते सिद्ध करावं, आम्ही राजकारणातून काढता पाय घेऊ’ असे वक्तव्य केले होते. तसेच एकूणच जालना येथील घटनेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला. जालना येथील लाठीचार्जची घटना सर्वांनी बघितली, मात्र लाठीहल्ला का आणि कुणी केला, हे तपासणं सरकारचं काम आहे, ते त्यांनी करावं असा सल्ला शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. शरद पवार यावेळी म्हणाले की, “मला फक्त एवढंच माहिती आहे की, तिथे लाठी हल्ला झाला, कुणी केला, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दिसत आहे की पोलीस कर्मचाऱ्यांकडून लाठीहल्ला होत आहे. त्याच्या खोलात जाणं सरकारचं काम आहे, कुणी सूचना दिल्या, का दिल्या, या सगळ्या गोष्टीच स्पष्टीकरण सरकारने द्यावं, कारण ते त्यांच्या हातात आहे, आम्हा लोकांच्या हातात नाही.” घडलेल्या प्रकाराबाबत फडणवीस यांनी माफी मागितली. यावर शरद पवार म्हणाले की, “फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माफी मागितली, यातून काही सत्य बाहेर आले, आता सरकार ठरवेल काय करायचे ते, गोवारी प्रकरण झाले कधी, त्यावेळी काहींनी राजीनामा दिला. या दोन घटनामधून कोणी प्रेरणा घेतली तर बघू.”

तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या गोवारी प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, “तो प्रकार कधी झाला, तो लाठीहल्ला नव्हता, चेंगराचेंगरी झाली होती. तेव्हा आम्ही लोक सत्तेत होतो, तर आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) हे होते. त्या प्रकरणानंतर पिचड यांनी राजीनामा दिला होता. नंतर मुंबईतील (Mumbai) प्रकरणात आर आर पाटील (RR Patil) यांनी दिला होता. पूर्वीची दोन उदाहरणे बघा, मार्ग काढायची इच्छा असेल तर निघू शकतो, इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करण्यात अर्थ नाही.” तसेच कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्यात आली. यावर पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना एक वर्ष मिळाले, त्यात ते ९ ते १० महिने आजारी होते, त्यामुळे इतर काम करता आले नाही. आता कोणाला इच्छा असेल तर एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यात अर्थ नाही. त्यावर आता भाष्य करणे योग्य नाही.”

हे ही वाचा: 

मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले…

गणेश उत्सवमंडळांना निवासी दराने मिळणार वीज, टाटा पॉवरचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version