spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एक कर्तुत्ववान, अभ्यासू महिला दिल्लीची मुख्यमंत्री होते, ही अभिमानाची गोष्ट: Sharad Pawar; दिल्लीच्या राजकारणाचे राज्यात मोठे पडसाद?

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पायउतार होत नव्या मुख्यमंत्रीपदी अतिशी मार्लेना (CM Atishi Marlena) यांचीनिवड कर्नाय्त आली. दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून अतिशय यांनी पदभार स्वीकारला. देशातील राजकारणात यामुळे मोठा बदल पाहायला मिळत असून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे राज्याला आता पहिली महिला मुख्यमंत्री लाभणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शरद पवार यांनी आज (रविवार, २२ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत दिल्लीतील राजकारणावर भाष्य केले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अतिशी यांच्याबाबत बोलताना, “एक कर्तुत्ववान अभ्यासू अशी महिला दिल्लीची मुख्यमंत्री होते, ही अभिमानाची गोष्ट आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यावेळी म्हणाले, “केजरीवाल हे अतिशय उत्तम काम करीत होते. त्यांना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अडचणी आल्या. त्यांच्या विरोधात सतत खोट्या केसेस केल्या गेल्या. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय होता. एक कर्तुत्ववान अभ्यासू अशी महिला दिल्लीची मुख्यमंत्री होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. दिल्लीचा नेतृत्व करून ह्या प्रशासनाचा दर्जा उंचावला. त्या चांगल्या काम करतील, असा मला विश्वास आहे,” असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी मध्ये सुरु असलेया जागावाटपासंदर्भात ते म्हणाले, “निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ एका ठिकाणी निर्णय बसून घेण्याच्या ऐवजी विविध सहकाऱ्यांची मते लक्षात घेऊन सगळ्याचा अभ्यास करून महत्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे इच्छुक आहेत, त्यांचा अभ्यास चालू आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांची काही वरिष्ठ नेत्यांची टीम आहे, ते याबाबत योग्य निर्णय घेतील. ही निवडणूक तीन पक्ष एकत्रित येऊन लढणार आहोत, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्रित लढणार आहोत. तीन पक्ष एकत्रित लढणार म्हणजे यात कोणतीही एक जागा असेल ही जागा कोण लढवणार, याबाबत याची चाचपणी सुरू आहे. लवकरच तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसून जागा वाटपाबाबत प्रक्रिया संपेल. आम्ही लवकरच तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक घेणार आहोत आणि एका विचाराने बैठकीत निर्णय घेणार आहोत. याबाबत आमची बैठक झालेली नाही. येत्या आठ दिवसात ही बैठक पार पडेल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

गृहविभागाकडून आडकाठी का आणली जातेय? Combine परीक्षेचा मार्ग खुला करा, अन्यथा पुन्हा एकदा….Rohit Pawar यांचा गृहविभागाला इशारा

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली; Congress शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन, काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्या जीवाला धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss