spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास दिला नकार, CRPF अधिकाऱ्यांना केले परत, सविस्तर घ्या जाणून

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. मात्र आता शरद पवारांकडून ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी Z+ सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. पवार यांनी सीआरपीएफ अधिकाऱ्यांना परत केल्याचे सूत्रांनी सांगितले.समोर आलेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, केंद्राने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. पवार यांच्या झेड प्लस सुरक्षा कवचाचा एक भाग म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या 55 सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी नियुक्त करण्यात आली होती. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

केंद्राकडून सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी २३ ऑगस्ट रोजी हेरगिरीची भीती व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, “गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितले की सरकारने तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी त्यापैकी एक आहे. “निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे माझ्याबद्दलची खरी माहिती मिळण्याचे हे एक माध्यम असू शकते, हे सांगू या वर्षी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत” असे त्यांनी उपरोधिकपणे सांगितले होते.

आज शरद पवारांची दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी मला मान्य नाहीत, असे पवारांनी यावेळी सांगितलं. त्यामुळेच आता शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याचे बोललं जात आहे.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss