शरद पवारांनी दिले फडणवीसांना खोचक शब्दात उत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी १९७७ मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं विधान केले आहे.

शरद पवारांनी दिले फडणवीसांना खोचक शब्दात उत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी १९७७ मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं विधान केले आहे. आज देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी खोचक शब्दामध्ये उत्तर दिले आहे. आज बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “१९७७ साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी मी भाजप माझ्यासोबत होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात,” अशी खोचक टीका शरद पवारांनी केली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, “कधी केली पवारांनी? कधी केली हे त्यांनी सांगावं. १९७७ साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. ते लहान होते त्यावेळी, त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू अडवाणी होते आणि काही सदस्य होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात, यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही.” असे शरद पवार म्हणाले.

 

आपल्याला दुसरी जबाबदारी द्यावी असं अजितपवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं होतं. आता अजितदादांची जबाबदारी बदलणार का आणि बदलली तर कोणती जबाबदारी देणार या प्रश्नावर शरद पवार म्हणाले. “हा निर्णय एकटा घेत नसतो. त्यांच्यासह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधी निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यापेक्षा जास्त काही नाही.” असे शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version