मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर

मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर

काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गासह (Samruddhi Mahamarg) विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर टीका करणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारत निशाणा साधला आहे. ते ८२ व्या वाढदिवसानिमित्त (birthday) आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात बोलत होते.

ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून उपस्थिती लोकांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “काल नागपूरमध्ये (Nagpur) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं. या भाषणामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचं, रस्त्याचं किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन करणं, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचं उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं, कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.” अशी टीका शरद पवारांनी केली.

शरद पवार पुढे म्हणाले, “मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांची कार्यक्रमं पाहिली आहेत. भाषणं ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकलं आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकारं असली तरी त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळलं जात नाही,” असंही शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

ट्विटर यूजर्ससाठी लॉन्च करणार लॉन्च ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज

Urfi Javed उर्फी जावेद साखळीच्या ड्रेस मुळे पुन्हा एकदा झाली ट्रोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version