Monday, September 30, 2024

Latest Posts

शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार – विजय शिवतारेंची टीका

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर प्रतिक्रियांना वेग आला आहे. अशातच आरोप प्रत्यारोपही केले जात आहेत. यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दोन तीन दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं विधान होत की, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो स्वागतार्ह असेल.

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर प्रतिक्रियांना वेग आला आहे. अशातच आरोप प्रत्यारोपही केले जात आहेत. यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दोन तीन दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं विधान होत की, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो स्वागतार्ह असेल. मात्र आता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्णयाला शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून शिवतारे यांनी टीका केली आहे. शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार असून त्यांना यातून स्वत: चा फायदा करून घ्यायचा होता, असेही शिवतारे यांनी म्हटले. त्यांना शिवसेना-भाजप युती नको हवी होती. यासाठी पवार यांनी भाजपला (BJP) २०१४ मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे ही शिवतारे यांनी म्हटले.

माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्या जोरदार टीका केली. निवडणूक आयोग घेणार असलेला निर्णय शरद पवार यांना अपेक्षित होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाचा जो निर्णय येईल, त्याचे स्वागत करायला हवे असे म्हटले होते. हे मोठे नेते कोणते डाव टाकतील हे सांगता येत नसल्याचे शिवतारे यांनी म्हटले. शरद पवार यांनी कधीही शिवसेनेशी जुळवून घेतले नाही. शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री असली त्यांचे राजकीय मतभेद होते. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या मोहातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत शरद पवार यांच्याकडे जाऊन बसले.

शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले. हा इतिहास तुम्ही पाहा, असेही शिवतारे यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, वर्ष २०१९ मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणायला लावला. त्यानंतर राज ठाकरे यांची गरज संपल्यावर त्यांना दूर झटकले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला असल्याचे सांगत पवार यांचा डाव काल यशस्वी झाल्याचा दावा शिवतारे यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडा हे सांगायला १६ आमदार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांना तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जा, असे सुनावले. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्यावर काय भानामती केली असेही शिवतारे यांनी सांगितले.

बाळासाहेबांनी शेवटी सभेत काँग्रेसची पंचसुत्री गाडा असंही सांगितल होत. याची आठवण कुणीही करून देत नाही सगळे दुसऱ्या विधानाची आठवण करतात माञ त्यांची बाळासाहेबांचा विचार संपवला. सगळ्या बंडखोर आमदारांनी एकच मागणी केली होती की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती तोडा आणि भाजपसोबत चला तुम्हीं म्हणाल तसं आम्ही ऐकू पण माहिती नाही त्यांनी काय जादु केली होती उध्दव साहेब यांनी आमचं ऐकलंच नाही. २०१९ मध्येच शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या असंही शिवतारे म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचे विजय शिवतारे यांनी म्हटले. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शरद पवार यांनी केलेल्या कृत्यावर नियती तुमच्यावर सूड उगवेल असा संतापही शिवतारे यांनी व्यक्त केला. शिवसेना एक विचार असून ती इमारत नाही. आम्ही विचारायचे वारसदार आहोत. आज ना उद्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हाल मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; दोन्ही गटांना हवं असलेलं नवं नावही सारखंच

Cremia Bridge explosion: स्फोटानंतर रशियन सरकार लवकरच करणार पुलाची पाहणी

भाजप केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss