‘मविआ’ चे निर्णय घेण्याचे अधिकार Sanjay Raut, Nana Patole, Jayant Patil यांना, Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

‘मविआ’ चे निर्णय घेण्याचे अधिकार Sanjay Raut, Nana Patole, Jayant Patil यांना, Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष कसून तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोघांमध्ये थेट लढत होणार असून राजकीय नेते आता रणनीती आखताना दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये राजकीय नेत्यांच्या बैठका, सभा, दौरे आणि यात्रा सुरु असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जात आहे. अश्यातच महाविकास आघाडीमध्येही काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP Sharad Pawar) आणि शिवसेना उबाठा गट (Shivsena UBT) यांच्यातदेखील आता रणनीती आखली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर मोठे भाष्य केले असून “संजय राऊत (Sanjay Raut), नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil) यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत” असे ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्र मध्ये वेगळं वातावरण आहे. लोकसभेला वेगळं चित्र होत. प्रधानमंत्री सांगत होते ४०० च्या वर जागा येतील. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक आला. यावेळी राष्ट्रवादी ने १० जागा लढल्या. त्यातील आठ आल्या. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते, पण लोकांनी आणि तुम्ही ठरवले हॊते. १ लाख ५८ हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली,” असे ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कुठंही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोकं भेटतात. लोकांच्यात खात्री झाली की या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं. चांगले निकाल लागतील यात शंका नाही. ही निवडणूक तीन लोकं एकत्र येऊन लढणार आहेत. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे. इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटत विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल. पुढच्या आठ ते दहा दिवसात हे काम संपले पाहिजे,” असे ते म्हणाले.

“निवडणूक आयोग तारीख ठरवेल. माझा अंदाज आहे की ६ ते १० च्या दरम्यान तारखा जाहीर करतील. 15 ते 20 नोव्हेंबर च्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसात जागेचा निर्णय होईल. आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे..आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. काही जागा काँग्रेस आणि सेनेला द्याव्या लागतील. आघाडी आहे म्हटल्यावर सगळ्या जागा घेऊन चालत नाही काही जागा सोडव्या लागतील. जागा सोडून चालणार नाही त्यांचे कामही करावे लागेल. तुम्ही निवडणुकीत कष्ट केले, त्यामुळे तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version