spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) अपेक्षित यश मिळाले नसले तरी यंदाच्या विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाड़ीत (Mahavikas Aghadi) जोरदार चुरस रंगणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवण्याचे निश्चित असले तरी अद्याप महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. आज (बुधवार, ४ सप्टेंबर) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केले. ‘मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावर होणार आहे. १९७७ मध्ये सर्वजण एकत्र आले होते त्यानंतर मोरारजी देसाई यांचे नाव समोर आले होते, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आता विचार करण्याचं काहि कारण नाही, असं म्हंटल आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याची आता काही कारण नाही. संख्याबळांनंतर यांचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. अद्याप काही ठरलेलं नाही. बहुमत नाही. बहुमत मिळेल असं वातावरण आहे. यात काही शंका नाही. पण आताच काही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “१९७७ साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कोणालाही पुढे केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं, आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्वजण एकत्र आले. त्यानंतर निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव पुढं आलं. निवडणुकीत मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कुठंही जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार या राज्याला देऊ. राज्यात आमची सातत्य येईल असे चित्र आहे. मात्र याचे नेतृत्व कोण करणार यावर अजून चर्चा झाली नाही. त्यामुळे याचा निर्णय आम्ही निवडणूक झाल्यानंतर घेणार आहोत,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss