Mohan Bhagwat यांच्या ‘सुपरमॅन’ वक्तव्यावरून Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Mohan Bhagwat यांच्या ‘सुपरमॅन’ वक्तव्यावरून Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (शनिवार, २० जुलै) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मोहन भागवत (Mohan Bhagwat)  यांनी कोणाचे नाव न घेता केलेल्या ‘सुपरमॅन’ टिकेवरून शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS) चे लोक वक्तव्य करायला लागले, याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी,” असे ते यावेळी म्हणाले.

मोहन भागवत यांच्या ‘त्या’ व्यक्तव्यावर शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आता मला कल्पना नाही, ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएस चे लोक वक्तव्य करायला लागले, याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी.”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते अतुल बेनके (Atul Benake)यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना ‘कोण अतुल बेनके?’ असासवल विचारला. ते म्हणाले, “हे अतुल बेनके कोण आहेत? एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने यांना उत्तर द्यावं, इतका महत्वाचा माणूस आहे का हा? तुम्ही कोणाबद्दल विचारायला हवं अन कोणाला महत्व द्यायला हवं, हे ठरवायला हवं.”

अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदलेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत,” असे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, “मनोज जरांगेना कोणती आश्वासनं दिली, हे सरकारने सांगितलं का? छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर मी सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची माहिती मागितली होती. पण आम्हाला अजिबात कोणी संपर्क साधला नाही. त्यांच्यात काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही,” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर यावेळी शरद पवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. ३५ वर्षे आमदार, त्यापैकी २५ वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना २५ वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधू पणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याचे उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

HEAVY RAINFALL : पुढील २४ तासात कोसळणार मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

VIDHANSABHA ELECTION मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; SHARAD PAWAR यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version