दिल्लीतील राष्ट्रवादी अधिवेशनात शरद पवारांचा भाजपावर निशाणा म्हणाले, …झुकणार नाही

दिल्लीतील राष्ट्रवादी अधिवेशनात शरद पवारांचा भाजपावर निशाणा म्हणाले, …झुकणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे. आज शरद पवारांनी आपल्या भाषणातून विविध मुद्य्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यात त्यांनी म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आम्हाला प्रेरणा मिळते, योग्य मार्ग दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे. त्या शिकवणीनुसार मी दिल्ली समोर झुकणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा आवाहन दिले.

हेही वाचा : 

‘ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है’ खा.श्रीकांत शिंदेची विरोधकांवर टीका

शरद पवार म्हणाले, “ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांकडून आपल्याला प्ररेणा मिळालेली आहे. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या विचारधारेने काम करणं हे आपण आपलं सर्वप्रथम कर्तव्य मानतो. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रगतीशील पक्षाच्या रुपात काम करू इच्छिते. शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात, तर त्यांनी एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडली आहे आणि ती म्हणजे, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकून त्यांनी स्वाभिमानाचा परिचय दिला आहे. आणि याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलं होतं. मला आनंद आहे की दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं गेलं होतं, त्या ठिकाणी आज आपलं अधिवशेन आयोजित करण्यात आलेलं आहे.” अशी भावना पवारांनी व्यक्त केली.

राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडत पवार यांनी पुढे म्हटले, बळीराजा देशाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो. देशाला शेतकऱ्याचा अभिमान आहे. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपल्या देशात ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांर गर्व आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रितपणे लढण्याची आवश्यकता आहे. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

सुशांतचे ‘ब्रह्मास्त्र’ बॉलीवूडला उद्ध्वस्त करणार… सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा

याचबरोबर, “ राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आणि अखंडित राखण्यासोबतच गतीशील विकासाची आज आवश्यकता आहे. काही सांप्रदायिक घटक सातत्याने समाजात जाती आणि धर्माच्या आधारावर विभाजन करू इच्छितात. पण हा सर्वांसाठी विशेषकरून महिला, अल्पसंख्याक, दलित, आदिवासींसाठी एक फार मोठा धोका आहे. निवडून आल्यानंतर आपण राज्यघटना आणि सर्व धर्मांचा सन्मान करू, अशी शपथ घेतो. परंतु काहीजण शपथ घेतल्यानंतर हिंदुत्व, मंदिर किंवा मशीद सारख्या मुद्य्यांवर वादग्रस्त भूमिका घेऊन, अल्पसंख्यांकाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आजही करतात. त्यामुळे आपल्याला जागृत राहीलं पाहिजे.” असं म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला.

Grandparents Day २०२२: ११ सप्टेंबर रोजी तुमच्या आजी-आजोबांना शुभेच्या देण्यासाठी काही खास कल्पना

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Time Maharashtra |Marathi news

Exit mobile version