शरद पवारांनी दिला इशारा, तटकरे, पटेल यांच्यावर…

तसेच 'राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर पक्ष प्रमुख म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, तो काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यांचा असू शकतो, असे ते म्हणाले.

शरद पवारांनी दिला इशारा, तटकरे, पटेल यांच्यावर…

आज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्री पदाची शप्पत घेतली. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व रणधुमाळी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत शपथ घेतलेल्या नेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याच संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत खासदार सुनिल तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत भाषण करताना शरद पवार म्हणाले, पक्षाच्या धोरणाशी विसंगत पाऊले कोणी टाकली असतील तर त्याचा निर्णय पक्षाचे लोक बसून घेतली. जयंत पाटील आदींशी चर्चा करावी लागेल. एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काहींची पदाधिकारी यांची नेमणूक मी केलेली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या भल्यासाठी पाऊले टाकलेली नाहीत. त्यांनी जबाबदारी पार पाडलेली नाही. यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई मला करावी लागेल.

तसेच ‘राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर पक्ष प्रमुख म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, तो काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यांचा असू शकतो, असे ते म्हणाले. राज्यातील कार्यकर्त्यांवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यांची अस्वस्थता झाली असणार. आम्हाला निवडून देतात, आम्ही सांगू ती भूमिका मांडतात. ते अस्वस्थ होणार, त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटना बांधावी लागणार आहे. ते मी आणि तरुण कार्यकर्ते करू, असे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या बंडखोरीवर थोरल्या पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊत यांनी केलेले भाकीत खरे ठरणारं का???

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version