spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला; राज ठाकरेंची पवारांवर टीका

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे आज आणि उद्या दोन दिवसीय कल्याण डोंबिवली दौरा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज ठाकरे कल्याण लोकसभा दौरा करत आहेत. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये राजकीय चिखल फेक सुरु आहे. विधानभवनामध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो तेव्हा कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळलं नाही. सध्या जे वातावरण आहे हे आधी कधीच पाहिलं नाही, छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाच्या चिन्हांचे अनावरण झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले. हे चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमच्या शाखा अध्यक्षांपर्यंत बैठका झाल्या आहेत. ठाणे कल्याण भिवंडी या ठिकाणी बैठका झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे. सर्व ठिकाणी चिखल झाला आहे, असे राज ठाकरे म्हणाले. लोकांनी नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. मी आधी बोलतो नंतर तुम्हाला पटतं. मराठा आरक्षणाबाबत मी बोललो होतो. माझ्या काळ्या केसांवर तुम्ही जाऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले.

मी मतदान केल्यानंतर फक्त टूग असा आवाज येतो. माझं मत मात्र कोणाला पडलं हे कळत नाही. सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात आहे. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने पाच वर्ष काय केलं? निवडणुकीसाठी यंत्रणा उभी का करु शकत नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात मिळण्यासाठी शासन कटिबद्ध – CM Eknath Shinde

तुतारी चिन्हाचं अनावरण होताच सत्ताधारी पक्षाने केली जोरदार टीका, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss