spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने मदत न केल्याने तडीपार..” ; Sudhir Mungantiwar यांनी केला Sharad Pawar यांच्यावर घणाघाती हल्ला

पुण्यातून २१ जुलैला अमित शाह यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचं सरदार म्हटलं. त्या टीकेला शरद पवारांनी पाच दिवसांनंतर छत्रपती संभाजी नगरातून उत्तर दिले गेले होते. सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे, असा जळजळीत पलटवार शरद पवार यांनी केला होता. साधारणतः त्यानंतरच भाजप अधिक आक्रमक झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजप आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध रंगलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. तर आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने मदत न केल्याने तडीपार झाले. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्री पण होऊ शकले नाही. केवळ ७ जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा पुढारी व्हायचा टोला त्यांनी लगावला.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नक्की काय म्हंटल ?

“नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकार तर थेट चर्चेस तयार आहे. त्यांनी पण भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरकार मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशी वारंवार चर्चा करत आहेत. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. महाविकास आघाडीने आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही. आता तरी त्यांनी ओबीसीविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. महाविकास आघाडीला तर दोन्ही समाजात वाद निर्माण करायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून की स्वतंत्र आरक्षण द्यायचे याविषयी महाविकास आघाडीने भूमिका जाहीर करावी. 

ओबीसी, मराठा समाजासह विरोधी पक्षासोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. पण विरोधक चर्चेपासून वाचत आहे. ते चर्चेवर बहिष्कार टाकत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. याविषयी शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. वनमंत्रीने विरोधी पक्षावर सत्तेसाठी जातीचा आधार घेत असल्याचा हल्लाबोल केला. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सजग नव्हतो आणि विरोधकांनी खोटे नरेटीव्ह पसरवले. संविधान बदलणार, मनुस्मृती लागू करणार असल्या गोष्टी पसरविण्यात आल्याने त्याचा फटका बसला.” असे ते म्हणाले. 

हे ही वाचा:

“शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर  सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार” Deepak Kesarkar यांची घोषणा

Uddhav Thackeray Birthday Banner : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जोरदार बॅनरबाजी, भावी मुख्यमंत्री…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss