spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वेदांता प्रकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रातून प्रकल्प जाणे म्हणजे…

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत.

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. दरम्यान हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं दुर्दैवी आहे. हा प्रकल्प आता परत महाराष्ट्रात येऊ शकत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

“वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचं आमिष दाखवलं जात असून याला काही अर्थ नाही. हे तर लहान मुलांना समजूत काढल्यासारखं आहे. पण तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही” असं शरद पवार म्हणाले आहेत.  हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात येत आहे. पण सामंत, शिंदे हे आमच्या सरकाच्या वेळेस मंत्री होते असाही टोला त्यांनी लावला आहे. त्याचबरोबर, “नरेंद्र मादी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली तर त्यांच्या भुमिकेचे स्वागत करू. पण सध्याच्या स्थितीवरून असं दिसतंय की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणं शक्य नाही. त्याच्या बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याची आमिष हे रडणाऱ्या पोराला फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं आहे.” असा टोला पवारांनी लावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की, “तळेगाव हा जो स्पॉट आहे , त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाईलसाठी अनुकूल आहे. इथं जर हा प्रकल्प असता तर कंपनीला अधिक फायदेशीर असता. त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. महाराष्ट्रातून हा प्रकल्प जाणे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे, तसं व्हायला नको होतं.” तसेच फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही.

केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. त्यामध्ये गुजरात आहे असं शरद पवार म्हणाले. या आधी महाराष्ट्राच्या नेतृत्वामुळे राज्यात गुंतवणूक यायची आता ती परिस्थिती दिसत नाही असं सांगत सध्याची परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांचे राज्याकडे लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय असं शरद पवार म्हणाले. या आधीची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्र नेहमी गुंतवणूकीच्या बाबतील एक नंबरला असायचं असं सांगत शरद पवार म्हणाले की, “काही नेते आणि अधिकारी हे नेहमी गुंतवणूक कशी येईल याकडे लक्ष द्यायचे. आताची परिस्थीती पाहता ते दिसत नाही, राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. आता फक्त काय झाडी, काय डोंगर हे ऐकायला मिळतंय. शिंदे सरकारचा कारभार अजून मला दिसला नाही.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील दौऱ्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्याचे प्रमुख गतीनं राज्यभर फिरून ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतील. दरम्यान, मोदी शाहा यांचं सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरात सारख्या राज्यांना होतो. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे गुजरातमध्येच सर्वांत जास्त दौरे झाले आहेत. त्यामुळे आता या विषयावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही. यानंतर जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात कसे येतील यावर सरकारने लक्ष द्यावं असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा:

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

सुकेश खंडणी प्रकरणी जॅक्लीन फर्नांडीसनंतर दिल्ली पोलिस करणार ‘या’ अभिनेत्रीची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss