दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ‘शिवाजी पार्क म्हणजे… ‘

मुंबईतील (Mumbai) शिवजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनेकडून (Shiv Sena) भव्य दसरा मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ‘शिवाजी पार्क म्हणजे… ‘

Sharad Pawar

मुंबईतील (Mumbai) शिवजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनेकडून (Shiv Sena) भव्य दसरा मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. यावर महापालिकेनं निर्णय घेत बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिलीय. मात्र, अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्याकरता कोणत्याच मैदानाचा अर्ज मंजुर झालेला नाही. ज्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं गणित आहे. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिंदेंना बीकेसीचे मैदान दिले आता त्यांनी विरोध करू नये”, असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसेचभाजपकडून सत्तेचा गैरवापर होतोय. कोणतंही कारण नसताना संजय राऊतांना आम्ही वाऱ्यावर सोडलं असं बोललं जातंय. याचबरोबर अनिल देशमुख, नवाब मलिक, यांनाही विनाकारण जेलमध्ये टाकलंय, असा आरोप पवार यांच्याकडून करण्यात आलाय.

पुढे शरद पवार म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा घडवण्यासाठी मोलाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी भाष्य केलं आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

२०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचं निर्णयात रुपांतर झालेलं नाही”. काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

“काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचं जाही केल्यासंबंधी विचारलं असता, आमच्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले. रामदास कदम यांनी उद्दव ठाकरे सोनिया गांधी, शरद पवार यांच्या नादी लागून बिघडले अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता, ‘कोण बोलतंय, कोण आरोप करतंय याची नोंद घेतली पाहिजे’ असा टोला लगावला.

“कारण नसताना संजय राऊत यांना तुरुंगात टाकलं आहे आणि आम्ही वाऱ्यावर सोडलं असं बोलत आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.

हे ही वाचा:

माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? – रामदास कदम

Raj Thackeray Live : वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version