शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शरथ घेतली. त्यांच्यासह आठ जणांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

२ जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. त्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अजित दादांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांचेच डोळे उंचावले. तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून महत्वाच्या बैठकादेखील घेण्यात आल्या. परंतु अद्यापही महाराष्ट्राचे राजकीय वातावरण शांत झालेलं नाही. अशातच अजित पवार यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल शरद पवार (शरद पवार) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगानं देणं अपेक्षीत होतं असं शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं पाठवली आहेत. यामध्ये अजित पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शरथ घेतली. त्यांच्यासह आठ जणांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. ३० जून रोजीचे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नेत्यांच्या कुंडलीत दडलंय काय? | Time Maharashtra | Maharashtra Politics

Salaar चा धमाकेदार टीझर आऊट, प्रभासचा लूक पाहून अंगावर शहारे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version