शरद पवार यांचे मिशन ‘ठाणे’

शरद पवार यांचे मिशन ‘ठाणे’

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन भाजप आणि शिवसेनेचा शिंदेचा गट सत्तेत सहभागी झाल्यावर पहिल्यांदाच शरद पवार यांनी महाविकास आघाडी बद्दलची आपली भूमिका विषद केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ठाण्याच्या दौऱ्यावर होते. लवकरच आपल्या राज्यव्यापी दौर्यला ठाण्यातून सुरुवात होईल अस सुतोवाच करून पवारांनी केंद्र सरकार व भाजपवर जोरदर हल्ला चढवला. २०१४ पासून भाजपने दिलेल्या आश्वसना पैकी एकही आश्वासन पूर्णत्वाला नेलं नसल्याच आरोपही पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे.

२०२१ साली निवडणूकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने ‘अच्छे दिन’ अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिनचं चित्र नागरिकांना दिसलेच नाही. २०२२ ला पुढच्या निवडणूकीच्या वेळी त्याचं विस्मरण झालं आणि न्यू इंडीया २०२२ अशी घोषणा करण्यात आली. २०२४ साठी आता नवीन आश्वासन दिलं जात आहे, ते म्हणजे ५ ट्रीलियन इकॉनॉमी आम्ही करू असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांगितल्यापैकी एकाही गोष्टीच शंभर टक्के पूर्तता झाल्याचे दिसत नाही असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : 

दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आणि तो शिवसेनेचाच होणार ; उद्धव ठाकरे

Exit mobile version