मविआ च्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

महापुरुषांबद्दल केलेली आक्षेपार्ह विधान, सीमावादावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आक्षेपार्ह विधान, बेरोजगारी महागाई यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या (MVA Morcha) वतीने उद्या ( १७ डिसेंबर ) महाविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मविआ च्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

HallaBol Morcha : महापुरुषांबद्दल केलेली आक्षेपार्ह विधान, सीमावादावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आक्षेपार्ह विधान, बेरोजगारी महागाई यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या (MVA Morcha) वतीने उद्या ( १७ डिसेंबर) महाविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा काही तासांवर येऊन ठेपला असताना देखील त्याला पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. यावरून राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती दिली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते कराडमध्ये (Karad) एबीपी माझाशी बोलत होते.

उदयनराजेंनी भूमिका चांगली घेतली. त्याबाबत समाधान आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे, असं शरद पवार म्हणाले. आंबेडकर, फुले, कर्मवीरांबाबत जी वक्तव्ये केली त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. कर्मवीरांनी भीक मागितली म्हणता हे संतापाचं आहे, दुर्दैवी आहे. त्याबाबतचं राज्यकर्त्यांना तारतम्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांना जेवायचा प्रश्न आला तेव्हा स्वत:च्या पत्नीच दागिने विकले ते काय भीक मागून नव्हे, असं शरद पवार म्हणाले. या गृहस्थांनी (राज्यपालांनी) शिवरायांबद्दल जे उद्गार काढले, त्याबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल.

पुढे शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी बोलताना सांगितलं होतं की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेव्हा त्यांनी परवानगीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. या मोर्चासंबंधी लोकांत औत्सुक्य आणि राग आहे.”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“या मोर्चाला परवानगी देण्यात पोलिसांना काहीच अडचण असण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी ठरलेल्या मार्गानुसार हा मोर्चा काढावा. तो शांततेच्या मार्गाने निघून कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

हे ही वाचा : 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा

Avatar The Way of Water २०२२ चा अखेरचा महिना अवतार साठी ठरणार लाभ दायक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version